आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनाकरिता उसळली गर्दी…!
———————————-
मूर्तिजापूर :- शहरातील स्टेशन विभागातील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात “आषाढी एकादशी’निमित्त आज सकाळी पहाटे पाचच्या सुमारास विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शहरातील स्टेशन विभाग येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आज सकाळी पहाटे पाचच्या सुमारास “आषाढी एकादशी’ निमित्त श्री. विठ्ठल रुख्मिणी च्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आला. तर पहाटे पासूनच दर्शना करीता भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. तद्दनंतर भाविकांना संस्थेच्या वतीने भाविकांना दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे व गुरवार दि. १८ रोजी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान च्या विश्वस्तांनी बोलताना सांगितले. तर आषाढी एकादशी निमित्त सकाळ पासून सायंकाळपर्यंत भंजनी मंडळाच्या वतीने भक्तीपर भंजन सादर करण्यात आले.
काल रात्री येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे विठ्ठल रुख्मिणी मंदिर रोषणाईने उजळून निघाले होते.
आषाढी एकादशी निमित्त आयोजित कार्यक्रमाकरिता तुळशीराम लोकरे, मयूर सुपले, प्रवीण लोकरे, भारत येदवर, शिवाजी शेंडे, बंटी येरडावकर, अमोल सुपले, अमोल लोकरे आदिनी परिश्रम घेतले.
———————————-
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.