#आषाढीवारी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमातून १३,९६,०७२ वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्ग आणि पंढरपूर येथे पुरविण्यात आलेली सेवा
प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’- २५८
वारी दरम्यान ११०२ व १०८ रुग्णवाहिका २४ बाय ७ उपलब्ध – ७०७
दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट –५८८५
महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ – १३६
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना –१३६
पालखी मार्गावर आरोग्य दूत –२१२
पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – ९
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ खाटांची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – ८७
आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.