स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट कडून मोफत चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न

सुधीर दिवे यांच्या ५५ व्या वाढदिवसाच्या औचित्याने आयोजित भव्य महाआरोग्य शिबीरासाठी पंचक्रोशीतील पाच हजाराहून रुग्णांनी लाभ घेतला होता,

अक्षय अहिव-विदर्भ ब्युरो चीफ CEN NEWS Tv-7875971974
21

सुधीर दिवे यांच्या ५५ व्या वाढदिवसाच्या औचित्याने आयोजित भव्य महाआरोग्य शिबीरासाठी पंचक्रोशीतील पाच हजाराहून रुग्णांनी लाभ घेतला होता, या शिबिराचे आयोजन कृषीप्रधान टीव्ही चॅनल, संत अच्चूत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे वर्धा आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

यामध्ये नेत्र तपासणी, हृदय विकार सह इतर सर्व रोगावर निदान व उपचार करण्यात आले.

नेत्र रुग्णांना स्व वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

तसेच शिबिरात दाखल झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले योजने अंतर्गत आणि स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्या शिबिरा मधील रुग्णांचे मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम आज तळेगांव येथील शिवणकला प्रशिक्षण कार्यालयात नागपूर रोड तळेगांव परिसरातील रुग्णाचे चष्मे स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित सुधीर दिवे मार्गदर्शक स्व वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट, अनिल जोशी अध्यक्ष मदत फाऊंडेशन आर्वी, बाबुजी लड्डा संचालक मानस उद्योग समूह, अजयभाऊ लोखंडे, जयाताई चौबे,धनंजय चौबे, सचिनभाऊ गावंडे, विशाल गाडगे, धिरज मानमोडे संपादक कृषिप्रधान टीव्ही,मयूर वानखडे, नानकसिंग बावरी, देवानंद शेळके चिस्तुर,विनोद घोगरे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.