श्री. संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

येथील राव राठोड तैलिक समाज पुलगाव द्वारा संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

15

वर्धा-(पुलगाव) : येथील राव राठोड तैलिक समाज पुलगाव द्वारा संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.येथील स्थानिक डॉ. निलेश गुल्हाने यांच्या गांधीचौक येथील राहते घरी हा कार्यक्रम उत्साहात व मोठ्या संख्येत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. निलेश गुल्हाने तर प्रमुख अतिथी म्हणून प्रविण ढांगे, गंगाधर कपिले, महिला अध्यक्ष सौ वर्षा बाभळे, यांनी आपले स्थान भूषविले, कार्यक्रमाची सुरुवात संत श्री. संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. गुल्हाने तर संचालन व आभार सौरभ श्रीराव यांनी केले.

समाजात एकजुटीने राहणे, व सहकार्याची भूमिका ठेवून समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्यास नवयुवकांनी एकत्र येण्याची गरज आहे , इतकेच नव्हेतर एकत्र येऊन नवयुवकांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे आव्हाहन डॉ. निलेश गुल्हाने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. कार्यक्रमाला समाजातील मान्यवर शंकरराव काळे, लक्ष्मणराव जयसिंगपुरे, राजेश सावरकर, रामभाऊ काळे, राजेंद्र रवाळे, अंबादास गुल्हाने, प्रदीप आंबडेकर, सौ.मनीषा गुल्हाने, सौ.पुष्पां श्रीराव, सौ.संजना शहाडे, सौ.वनिता डाफे, सौ.उषा गुल्हाने, सौ. साधना गुल्हाने, उपस्थित होते. व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दिलीप गुल्हाने, आशिष काळे, सौरभ श्रीराव, चिंतामण आसोले, सतीश जयसिंगपुरे, प्रणेश शिरभाते, चंदू जयसिंगपुरे, अमोल बीजवे, अनिल गिरुळकर, जितेंद्र आसोले,प्रकाश कपले, रमेश मोहोकार, प्रविण डाफे,आदींचे सहकार्य लाभले.व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.