वर्ध्याच्या आर्वीत मोफत पशुचिकित्सा व औषधोउपचार आणि पशुसंवर्धन मार्गदर्शन शिबीर सप्ताह

स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने.

अक्षय अहिव- CEN NEWS Tv-7875971974
96

(आर्वी) स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने. दिनांक 30/11/18 ते 6/12/18 पर्यंत आयोजित मोफत पशुचिकित्सा व औषधोउपचार आणि पशुसंवर्धन मार्गदर्शन शिबीर सप्ताह राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट च्या विशेष साहाय्याने आयोजित कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ आज आर्वी येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे पारपडला. व मोफत शिबीरातील पहिले शिबीर आर्वी येथील पशुवैद्यकीय दवाखाना जिल्हा परिषद यांच्या प्रांगणात पारपडले यावेळी आर्वी शहरातील जवळ जवळ 300 पशु पालकांनी याचा लाभ घेतला. या उदघाटन सोहळ्याला उपस्थित

स्व. वामनराव दिवे चॅरीटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे, विजयराव मुडे माजी खासदार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने, पशु वैद्यक व मत्स्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. बी. हरणे, डॉ. ए. पी. सोमकुवर संचालक विस्तार व प्रशिक्षण म.प.म. वि. वि. नागपूर, डॉ. ए. एस.बन्नाळीकर कार्यक्रम संयोजक सहयोगी अधिष्ठाता ना. प. वै. म. नागपूर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे(गुल्हाने), राष्ट्रीय सेवा आयोगाचे समन्वयक डॉ. बसुनाथे, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टर व पशु आरोग्य शिबिराचे समन्वयक प्रसन्नकुमार बंब, मदत फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलजी जोशी, कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेशजी भिसे, जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे, स्व. वामनराव दिवे चॅरीटेबलचे ट्रस्टचे सदस्य अमित कडवे, ट्रस्टचे समन्वयक मंगेश चांदुरकर, सुनील इंगळे, अशोक विजयकर, सागर निर्मळ आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.