नवी मुंबई महापौर चषक 40 प्लस क्रिकेट शुभारंभप्रसंगी क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रध्दांजली

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 3 ते 5 जानेवारी या कालावधीत आयोजित नवी मुंबई महापौर चषक 40 प्लस क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी नामांकित क्रिकेट प्रशिक्षक पद्मश्री रमाकांत आचरेकर...

5

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 3 ते 5 जानेवारी या कालावधीत आयोजित नवी मुंबई महापौर चषक 40 प्लस क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी नामांकित क्रिकेट प्रशिक्षक पद्मश्री रमाकांत आचरेकर यांना एन.एम.एस.ए. क्रीडांगणावरील खेळपट्टीवर स्तब्ध उभे राहून नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व सर्व उपस्थित मान्यवर आणि खेळाडूंनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रविण आमरे, चंद्रकांत पंडीत, बलविंदरसिंग संधू, समिर दिघे अशा नामांकित क्रिकेटपट्टूंना घडविणा-या क्रिकेटच्या महागुरुला मानवंदना देण्यात आली.

यावेळी महापौर श्री. जयवंत सुतार यांचे समवेत आमदार श्रीम. मंदा म्हात्रे, आमदार श्री. संदीप नाईक, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, सभागृहनेता श्री. रविंद्र इथापे, परिवहन समिती सभापती श्री. रामचंद्र दळवी, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. मुनवर पटेल व उपसभापती श्री. गिरीश म्हात्रे, 40 प्लस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मास्टर प्रदिप पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. अनिता मानवतकर, नगरसेवक श्री. लिलाधर नाईक व श्री. प्रकाश मोरे, माजी नगरसेवक श्री. सिताराम मढवी, 40 प्लस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी श्री. लिलाधर पाटील, श्री. विकास मोकल, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव उपस्थित होते.

तीन दिवस चालणा-या या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील 32 व शहरी भागातील 15 क्रिकेट संघ सहभागी झाले असून यावर्षीचा स्पर्धा विशेष म्हणजे या स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी दि. 05 जानेवारी 2019 रोजी नेरुळ येथील डॉ. डी.वाय.पाटील स्टेडीयममध्ये दुपारी 1 वाजल्यापासून सुरु होणार आहे.

यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक व अधिकारी यांच्या संघात सायं. 5 वा. प्रदर्शनीय सामना खेळविला जाणार असून त्यानंतर 40 प्लस स्पर्धेचा अंतिम सामना व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

तरी 40 प्लस क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून वयाच्या चाळीशी नंतरही फिटनेस टिकवून ठेवणा-या क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नेरुळ येथील डॉ. डी.वाय.पाटील स्टेडीयममध्ये दि. 05 जानेवारी रोजी दुपारी 1 पासून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती श्री. मुनवर पटेल यांच्या वतीने करण्यात येत आहे.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.