नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उत्साहात शुभारंभ

नवी मुंबई या आधुनिक नावाजलेल्या शहराला मोठी सांस्कृतिक परंपरा असून इथल्या मूळ गावांमधून नाटय, गायन, संगीत सादरीकरणाची परंपरा अनेक वर्षापासून जपली जात आहे.

14

नवी मुंबई या आधुनिक नावाजलेल्या शहराला मोठी सांस्कृतिक परंपरा असून इथल्या मूळ गावांमधून नाटय, गायन, संगीत सादरीकरणाची परंपरा अनेक वर्षापासून जपली जात आहे. त्यामध्ये नवी मुंबई शहर वसल्यानंतर मोठया प्रमाणावर भर पडली असून नवी मुंबई महानगरपालिका येथील कलावंतांना विविध स्पर्धांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे असे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री.जयवंत सुतार यांनी राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धेच्या माध्यमातून येथील मुलांना आपले कलागुण दाखविण्याची चांगली संधी उपलबध करुन दिली जात आहे असे मनोगत व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या वतीने विष्णुदास भावे नाटयगृहात आयोजित नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धा अंतिम फेरीच्या शुभारंभ प्रसंगी महापौरांनी सादरीकरण करणा-या बालनाटय समुहांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी महापौर श्री.जयवंत सुतार यांच्या समवेत सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री.मुनवर पटेल व उप सभापती श्री.गिरीश म्हात्रे, नामवंत अभिनेत्री श्रीम.नयना आपटे, दिग्दर्शक श्री.किरण नाकती व श्री.प्रताप फड, क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धा महोत्सवात राज्यभरातील विविध जिल्हयातून 28 बालनाटय समुहांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्राथमिक फेरीतून अंतिम 8 बालनाटयांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. त्यामध्ये सुजाण प्रतिष्ठान शहापूर, रंग शारदा कलामंच खोपोली, सेक्रेड हार्ट हायस्कुल वरप कल्याण, आर्टिस्ट प्लॅनेट ऐरोली, निष्ठा सामाजिक संस्था वाशी, शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान ऐरोली, संदेश विदयालय विक्रोळी तसेच समृध्दी सांस्कृतिक कलामंच ठाणे हे 8 बालनाटय समूह अंतिम फेरीत दिवसभर सादरीकरण करणार असून सायंकाळी 7.00 वा. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.