नवी मुंबई महानगरपालिका

प्रसिध्दीकरीता दि. 10/05/2018

43

नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी श्री. सुरेश कुलकर्णी यांची निवड

 

नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणूकीत नगरसेवक श्री. सुरेश शिवाजी कुलकर्णी यांची बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करत मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी श्री. शिवाजी जोंधळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूकीत श्री. सुरेश शिवाजी कुलकर्णी यांना 9 तसेच श्रीम. दिपाली सुरेश संकपाळ यांना 6 मते प्राप्त झाल्याने श्री. सुरेश कुलकर्णी बहुमताने निवडून आले. नवनिर्वाचित सभापतींचे महापौर श्री. जयवंत सुतार, आमदार श्री. संदीप नाईक, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेता श्री. रविंद्र इथापे, विरोधीपक्ष नेता श्री. विजय चौगुले तसेच इतर पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी यांनी अभिनंदन केले.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.