नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरीता

19 मे 2018 पर्यंत करावयाचे 04 जून रोजीच्या महानगरपालिका लोकशाही दिनाकरीता अर्ज

25

 महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

माहे जून महिन्याचा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि. 04 जून 2018 रोजी होणार असून निवेदनकर्त्यांनी आपला अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये दि. 19 मे 2018 पर्यंत माआयुक्तनवी मुंबईमहानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज‘ असे अर्जाच्या वरील दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.

सदर अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावेअर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावाअर्जादाराने संबंधित विषयाबाबत याआधी विभाग कार्यालयविभागप्रमुख स्तरावर निवेदनसादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये – न्यायप्रविष्ट प्रकरणेराजस्व/अपिलसेवाविषयक – आस्थापनाविषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावीत्याचप्रमाणे विहित नमुन्यातनसणारे  अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती  जोडलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीततसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशाप्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.

लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारतजनसंपर्क विभागतिसरा मजलासे. 15 किल्ले गांवठाण जवळसी.बी.डी., बेलापूर येथेविनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in यावरील फॉर्मस् अर्ज सेक्शनमधून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंदघ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.