नमुंमपा लेखा विभाग आंतर विभागीय क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप चषकाचा मानकरी

साठी वेळ मिळावा व त्यांच्या अंगभूत कला क्रीडा गुणांना सादर करण्याची संधी लाभावी याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षी आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कला सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

7

नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजापासून थोडासा स्वत:साठी वेळ मिळावा व त्यांच्या अंगभूत कला क्रीडा गुणांना सादर करण्याची संधी लाभावी याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षी आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कला सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यामधून महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी कामकाजातल्या तणावापासून दूर रहावे व त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा यादृष्टीने क्रीडा व कला गुणदर्शनपर स्पर्धा उपक्रम महत्वाचे ठरतात.

यावर्षीच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महानगरपालिका आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत लेखा विभागाने जनरल चॅम्पियनशीपचा बहुमान पटकाविला.

या निमित्त विशेषत्वाने आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवक, पत्रकार, अधिकारी अशा तीन संघातील प्रदर्शनीय क्रिकेट सामन्यांमध्ये महापालिका अधिकारी संघाने विजेतेपद पटकाविलेले असून, नगरसेवक संघ उपविजेता ठरलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अभियंता श्री.संजय पाटील, अधिकारी संघ आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्री. करण मढवी, नगरसेवक संघ यांना स्मृतीचिन्हे प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.

या निमित्ताने आयोजित आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेतील महिला अधिकारी, कर्मचा-यांसाठीच्या सुपर वुमन स्पर्धेत क्रीडा विभागातील श्रीम. प्रज्ञा भोईर या विजेत्या ठरल्या. अ विभाग कार्यालय बेलापूर विभागील श्रीम. सिमा विश्वे यांनी उपविजेतेपद तसेच समाज विकास विभाग, बेलापूर येथील श्रीम. प्रतिक्षा कोऱे, सी विभाग कार्यालय वाशी विभागातील श्रीम. तृप्ती गायकवाड व श्रीम. कार्तिकी वाडकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आंतर विभागीय क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेत पुरुष गटात परिवहन विभागाने प्रथम क्रमांक पटकावलेला असून, वाहन चालक संघ उपविजेता ठरलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून श्री. लतिकेश पाटील परिवहन विभाग आणि उत्कृष्ट गोलंदाज श्री. विजय भोईर परिवहन विभाग यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कंत्राटी कामगार क्रिकेट स्पर्धेत शिक्षण विभागाने विजेतेपद, माता बाल रुग्णालय नेरुळ यांनी उपविजेतेपद तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून श्री. गुरुनाथ पाटील शिक्षण विभाग आणि उत्कृष्ट गोलंदाज श्री. अविनाश पाटील माता बाल रुग्णालय नेरुळ यांना सन्मानीत करण्यात आले.

व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष गटात लेखा विभागाने प्रथम क्रमांक व जनसंपर्क विभागाने व्दितीय क्रमांकाचे मानांकन पटकाविले.

थ्रोबॉल स्पर्धेत महिला गटात अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राने प्रथम क्रमांक तसेच डी विभाग कार्यालय, तुर्भे यांनी व्दितीय क्रमांक संपादन केला.

महिला क्रिकेट स्पर्धेत लेखा विभागाने प्रथम क्रमांक पटकाविलेला असून, अ विभाग कार्यालय बेलापूर उपविजेता ठरलेला आहे.

कॅरम स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक श्री. संतोष जोशी बांधकाम विभाग व व्दितीय क्रमांक श्री. गणेश उपरे शिक्षण विभाग यांनी पटकाविलेला आहे.

महिला कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीम.मनिषा पवार सी विभाग कार्यालय वाशी व व्दितीय क्रमांक श्रीम. सुनिता वीर सार्वजनिक आरोग्य अभियांत्रीकी विभाग यांनी पटकाविलेला आहे.

ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुष गटात 100 मी. धावणे प्रथम क्रमांक श्री. अभिजित वसावे प्रशासन विभाग, व्दितीय क्रमांक श्री. विक्रांत घरत लेखा विभाग व तृतीय क्रमांक श्री. निलेश म्हात्रे इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र यांनी तसेच महिला गटात 100 मी. धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीम. पुजा मोरजकर आरोग्य विभाग, व्दितीय क्रमांक श्रीम. प्रतिक्षा बिलकुले इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र आणि तृतीय क्रमांक श्रीम. अंकिता कोळी प्रशासन विभाग यांनी संपादन केला.

40 वर्षावरील महिला गटात 50 मी. धावणे प्रथम क्रमांक श्रीम. सुचिता गीध परवाना विभाग, व्दितीय क्रमांक श्रीम. सुरेखा वाडे कर आकारणी विभाग आणि तृतीय क्रमांक श्रीम. शारदा बनसोडे, प्रथम संदर्भ रुग्णालय, वाशी यांनी संपादन केला.

पुरुष गोळाफेक स्पर्धेत श्री. महेश मोहिते इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र हे प्रथम, श्री. निशिकांत ठाकूर लेखा विभाग, हे व्दितीय आणि श्री. निलेश म्हात्रे इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

महिला गोळाफेक स्पर्धेत इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या श्रीम. अश्विनी थोरात प्रथम क्रमांक, श्रीम. प्रतिक्षा बिलकुले व्दितीय क्रमांक व श्रीम. अमृता देवकर समाज विकास विभाग तृतीय क्रमांक विजेते ठरले.

रस्सीखेच पुरुष गटात लेखा विभाग प्रथम क्रमांक व प्रथम संदर्भ रुग्णालय वाशी यांनी व्दितीय क्रमांक पटकाविला. रस्सीखेच महिला गटात मुख्यालय विभाग प्रथम क्रमांक व इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र व्दितीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

या सर्व स्पर्धांमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. तसेच नगरसेवक, पत्रकार यांनीही प्रदर्शनीय क्रिकेट सामन्यात उत्स्फुर्त सहभाग घेतला. क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव तसेच क्रीडा विभागातील कर्मचारी आणि श्री. विलास कांबळे, श्री. रवी जाधव यांनी या स्पर्धा आयोजनात महत्वाची भूमिका बजावली त्यांनाही याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.

वर्धापन दिनानिमित्त सादर झालेल्या कला गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर संध्याकाळी नगरसेवक श्री. संजू वाडे, नगरसेविका श्रीम. मोनिका पाटील व श्रीम. संगिता म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त शहर श्री. रविंद्र पाटील, इटीसी संचालक डॉ. वर्षा भगत, सहाय्यक आयुक्त श्री. दिवाकर समेळ यांच्या शुभहस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. सुप्रसिध्द गायक श्री. सतीश भानुशाली व श्रीम. अजीता मेस्त्री यांनी सांस्कृतिक स्पर्धेचे परीक्षण केले.

गायन स्पर्धेत श्री. विकास नाईक हे प्रथम क्रमांकाचे तसेच श्री. गणेश देशमुख व डॉ. संजय जाधव यांनी व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. श्री. अजित बिहाडे व श्री. अनिल गायकवाड यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. समुह गायनात माधूरी गृपच्या समुहाने सादर केलेला पोवाडा उल्लेखनीय पारितोषिकाचा मानकरी ठरला.

वैयक्तिक कलागुण दर्शन प्रकारामध्ये श्री. संतोष गिरी (नकला), श्रीम. शुभांगी बिडवे व श्रीम. शारदा बनसोडे (अभिनय) आणि श्रीम. निता रांजणे (स्वकाव्य वाचन) हे अनुक्रमे तीन क्रमांकांचे मानकरी ठरले.

समुह नृत्यामध्ये बिंदिया कांबळे आणि समुह प्रथम क्रमांकाचा तसेच रवी जाधव आणि गृप व्दितीय व सुरेखा वाडे आणि गृप तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.