तुर्भे विभागात ठिकठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता मोहिम

लोकसहभागातून स्वच्छता मोहिमेला गती देण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण 2019 ला सामोरे जाताना सर्व विभागात स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

14

लोकसहभागातून स्वच्छता मोहिमेला गती देण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण 2019 ला सामोरे जाताना सर्व विभागात स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अशाचप्रकारे तुर्भे विभाग कार्यक्षेत्रातील इंदिरानगर, सेक्टर-20, तुर्भे स्टोअर अशा विविध ठिकाणी स्वच्छतेबाबत विशेष जनजागृती मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये नागरिकांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घ्यावा व दैनंदिन जीवनातून प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा याविषयी आवाहन करण्यात आले. ओला कचरा व सुका कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी वेगवेगळा ठेवणे व कचरा गाडीत वेगवेगळा देणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे, प्लास्टिकच्या पिशव्या तसेच थर्माकोलपासून बनविलेल्या वस्तुंचा वापर न करणे याविषयांवर पथनाट्यासारख्या मनोरंजक प्रचार माध्यमाव्दारे जनजागृती करण्यात आली. या मोहिमेस तुर्भे विभागातील स्वच्छता अधिकारी श्री.सुधाकर वडजे, शाळेचे शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक श्री. संजय बदे, श्री. जयेश पाटील, उप स्वच्छता निरीक्षक श्री. मनोज मोहिते, सोमेश्वर पाठक, श्री. मंगेश सालकर, श्री. मिलिंद आंबेकर, श्री. राजेंद्र बाविसकर, भुषण पाटील व स्वच्छाग्रही आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.