जाहिरणाम्याचा पंचनामा-शेतकरी नेते विशाल चौधरी

सबका साथ सबका विकास म्हणत मोदी सरकार 2014 मध्ये बहुमत घेऊन सत्तेत आले. खरे मात्र आज पर्यंत ठोस अस एकही काम शासनाने ग्रामीण लोकांसाठी केलेलं नाही

अक्षय अहिव-विदर्भ ब्यूरो चीफ CEN NEWS Tv-7875971974
55

अमरावती-: सबका साथ सबका विकास म्हणत मोदी सरकार 2014 मध्ये बहुमत घेऊन सत्तेत आले. खरे मात्र आज पर्यंत ठोस अस एकही काम शासनाने ग्रामीण लोकांसाठी केलेलं नाही असा घणाघाती आरोप करत सरकारच्या जाहिरनाम्याचा पंचनामा शेतकरी नेते विशाल चौधरी यांनी केला आहे.

दि. 4 डिसेंबर रोजी चांदूररेल्वे मधील आमला या गावी त्यांची जाहीर सभा झाली या सभेत शेतकरी नेते विशाल चौधरी बोलत होते.सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर आजपर्यंत लोकांना फक्त आशेवर जिवंत ठेवलं असून नोटबंदी मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शिवाय स्वामिनाथन आयोग लागू करण्याच ही आश्वासन दिलं होतं. पण हे लागू होऊ शकत नसल्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोर्टाला सांगतात पण त्यांचे नेते मात्र अजूनही तेच आश्वासन देत आहेत असे शेतकरी नेते विशाल चौधरी म्हणाले.

या सभेच्या वेळी मंचावर यादव, दिनेश शर्मा,नांदुभाऊ खेरडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवा मित्र मंडळ आमला यांनी केले होते.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.