गोवर रुबेला लसीकरणाला उत्तम प्रतिसाद, 3 लाख 16 हजार मुलांना लसीकरण

गोवर रुबेला आजारांपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बालके संरक्षित रहावीत यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला महापालिका क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळाला असून 4 जानेवारी पर्यंत 3 लक्ष 16 हजार 785 मुलांना लसीकरण करण्यात आलेले आहे.

10

गोवर रुबेला आजारांपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बालके संरक्षित रहावीत यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला महापालिका क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळाला असून 4 जानेवारी पर्यंत 3 लक्ष 16 हजार 785 मुलांना लसीकरण करण्यात आलेले आहे.

27 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये लसीकरण पूर्व जनजागृती व प्रत्यक्ष लसीकरण यामध्ये शासनाच्या आरोग्य विभागाने नवी मुंबई महानगरपालिकेचे काम इतर महानगरपालिकांच्या तुलनेत सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे.

त्यादृष्टीने यापुढील काळात अधिक प्रभावी रितीने मोहिम राबवत 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील अधिकाधिक मुलांना लसीकऱण करण्याविषयी अतिरिक्त आयुक्त सेवा श्री. महावीर पेंढारी यांनी निर्देश दिले. गोवर रुबेला लसीकरणाच्या सिटी टास्क समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाला सध्याचे 91 टक्के लसीकरणाचे प्रमाण लवकरात लवकर 95 टक्क्यापर्यंत नेण्याविषयी उचित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, शिक्षणाधिकारी श्री. संदिप संगवे, तसेच सर्व महापालिका रुग्णालयांचे वैद्यकिय अधिक्षक, नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा उपस्थित होते.

गोवर रुबेला लसीकरणांतर्गत 4 जानेवारीपर्यंत 430 शाळांमध्ये 2 लाख 48 हजार 394 मुलांना तसेच बाह्य संपर्क सत्राव्दारे 68 हजार 391 लाभार्थींना म्हणजेच 3 लक्ष 16 हजार 785 मुलांना लसीकरण करण्यात आलेले आहे. गोवर रूबेला लसीकरणापासून नवी मुंबईतील कोणतेही बालक वंचित राहू नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून 9 महिने ते 15 वर्षे वयाच्या मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना अवश्य लसीकरण करून गोवर व रुबेला आजारांपासून संरक्षित करावे असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.