इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशा बाबत मोफत मार्गदर्शन शिबिरास भरघोस प्रतिसाद

30

इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या ‍ विद्यार्थ्यांना 11वी ऑनलाईन प्रवेशा बाबत  उचित माहिती होणेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने प्राश्री रमेश देशपांडे व प्रा. श्री दिनेश जोशी, सदस्य. 11वी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमुंबई यांचेमार्फत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक 18/06/2018 रोजी सकाळी 11 ते 1.00 या वेळेत एस.बी..पब्लिक स्कुल, नेरूळनवी मुंबई येथे केले होते.

सदर प्रशिक्षण नवी मुंबई मध्ये प्रथमच आयोजित केले असल्याने प्रशिक्षणास विद्यार्थी व पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला.  विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरतेवेळी येणा-या अडचणी व प्रवेश घेण्यासंदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत अतिश्य मोलाचे मार्गदर्शन तज्ञमार्गदर्शकांनी केले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचे तात्काळ निराकारण झालेयाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले व नागरीकांच्या वतीने पालक व विद्यार्थ्यांनी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार व्यक्त केले.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.